Area Conversion Calculator_Collapsible Menu_banner_WC

Banner-Dynamic-Scroll-CockpitMenu_LAP

BhflAreaCalculator

एरिया कन्व्हर्टर


वॅल्यू


क्षेत्रफळ रूपांतरण कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

क्षेत्रफळ रूपांतरण कॅल्क्युलेटर म्हणजे काय?

लँड एरिया कॅल्क्युलेटर म्हणूनही ओळखले जाणारे एरिया कन्व्हर्जन कॅल्क्युलेटर हे एक ऑनलाईन टूल आहे जे तुम्हाला जमिनीचे क्षेत्र कॅल्क्युलेट करण्यास आणि क्षेत्र मोजमाप युनिट्सचे अचूकपणे इतर मेट्रिक्समध्ये रूपांतरण करण्यास मदत करते.

Area Conversion Calculator: Overview_WC

लँड एरिया कॅल्क्युलेटर ऑनलाईन कसे वापरावे?

हे वापरण्यास आणि समजून घेण्यास सोपे आहे. तुम्ही तुमच्या जमिनीचे क्षेत्र कसे कॅल्क्युलेट करू शकता आणि त्याचे इतर मेट्रिक्समध्ये कसे रूपांतरण करू शकता ते येथे दिले आहे:

  1. रूपांतरित करावयाचे मोजमाप निवडा.
  2. निवडलेल्या मोजमापाचे एकक निवडा.
  3. तुम्हाला ज्या मोजमापात रूपांतरण करायचे आहे ते निवडा.

केवळ 3 इनपुटसह, कॅल्क्युलेटर तुम्हाला त्रुटी-मुक्त आणि त्वरित कन्व्हर्जन दर्शवेल. देशभरातील मापन युनिट्सशी व्यवहार करताना जमीन मोजमाप कॅल्क्युलेटर गोष्टी अधिक सोपे करते. एकर, हेक्टर, स्क्वेअर यार्ड, बीघा आणि कथा यासारखे भौगोलिक क्षेत्रात विविध जमीन मोजमाप युनिट्स आहेत.

Area Conversion Calculator: Uses and Function _WC

लँड एरिया कॅल्क्युलेटरचे लाभ

भारतासारख्या विविधता असलेल्या देशात राहत असलेल्या व्यक्ती देशभरातील भौगोलिक क्षेत्रात भिन्न असलेल्या रूपांतरण मापनाबाबत परिपूर्ण असू शकत नाहीत. मॅन्युअल कॅल्क्युलेशनवर अवलंबून राहणे कठीण असू शकते कारण त्यातून त्रुटी-मुक्त परिणाम येईलच असे नाही. कोणत्याही प्रॉपर्टी किंवा जमीन मूल्यांकनासंदर्भात अचूक निष्कर्ष गाठण्यास तुम्हाला मदत करण्यासाठी, आमचे तज्ज्ञ कॅल्क्युलेटर टूल वापरा. हे कॅल्क्युलेशन्स विशेषत: जेव्हा एखादी व्यक्ती लोन अगेंस्ट प्रॉपर्टी घेण्याचा विचार करते तेव्हा त्यांच्या जमिनीच्या प्रॉपर्टीचे मूल्य मूल्यांकन करण्यास मदत करतात.

एरिया कन्व्हर्जन कॅल्क्युलेटरचे काही लाभ येथे दिले आहेत:

  • हे टूल त्रुटी-मुक्त, त्वरित कॅल्क्युलेशन सुनिश्चित करते.
  • हे कमी प्रसिद्ध जमीन मेट्रिक्समध्ये मूल्ये रूपांतरित करण्यास मदत करते.
  • हे तुम्हाला जमिनीच्या वास्तविक मूल्यांकनाविषयी पूर्ण ज्ञानासह माहितीपूर्ण प्रॉपर्टी संबंधित निर्णय घेण्यास मदत करते.

भारतातील स्टँडर्ड युनिट कन्व्हर्जन

भारतातील स्टँडर्ड युनिट कन्व्हर्जन

कन्व्हर्जन एकक चिन्ह संबंध
चौरस इंच ते चौरस फूट चौ. इंच ते चौ. फूट 1 चौरस इंच = 0.00694 चौरस फूट
चौरस मीटर ते चौरस यार्ड चौ. मी. ते चौ. या 1 चौरस मीटर = 1.19 चौरस यार्ड
चौरस मीटर ते गज चौ. मी. ते गज 1 चौरस मीटर = 1.2 गज
चौरस फूट ते एकर चौ. फू. ते एकर 1 चौरस फूट = 0.000022 एकर
चौरस मीटर ते एकर चौ. मी. ते एकर 1 चौरस मीटर = 0.00024 एकर
चौरस फूट ते सेंटीमीटर चौ. फू. ते सेमी 1 चौरस फूट = 929.03 सेमी

खाली, तुम्हाला सामान्यपणे भारतात वापरल्या जाणाऱ्या विविध जमीन मोजमाप युनिट्ससाठी मूलभूत एरिया कन्व्हर्जन टेबल दिसेल.

Common Land Measurement Units in India_WC

भारतात वापरलेले इतर काही क्षेत्र कन्व्हर्टर युनिट्स

क्षेत्रफळाचे एकक रूपांतरण एकक
1 चौरस फूट (चौ. फू.) 144 चौ. इंच (1 फूट म्हणजे 12 इंच)
1 चौरस सेंटीमीटर 0.00107639 चौ. फू
1 चौरस इंच 0.0069444 चौ. फू
1 चौरस किलोमीटर (चौ. किमी) 247.1 एकर
1 चौरस मीटर (चौ. मी.) 10.76391042 चौ. फू
1 चौरस माईल 640 एकर किंवा 259 हेक्टर
1 चौरस यार्ड (चौ. या.) 9 चौ. फू
1 एकर 4840 चौ. या. किंवा 100.04 सेंट (जमीन मोजण्यासाठी प्रमाणित एकक)
1 हेक्टर 10000 चौ. मी. किंवा 2.49 एकर अंदाजे
1 बिघा 968 चौ. या
1 बिस्वा 151.25 चौ. या
1 किल्ला 4840 चौ. या
1 घुमाऊं 4840 चौ. या
1 कनल 5445 चौ. फू. किंवा 605 चौ. या
1 चातक 180 चौ. फू
1 कठ्ठा 600 चौ. फू

Common Land Measurement Units in India_WC

भारतातील स्टँडर्ड लँड एरिया कॅल्क्युलेशन युनिट्स

भारतात जमीन मोजण्यासाठी अनेक मापन आहेत आणि ते प्रदेशानुसार बदलतात. तुम्ही इच्छित युनिट्समध्ये मूल्य कन्व्हर्ट करण्यासाठी लँड एरिया कन्व्हर्टर किंवा लँड मोजमाप कॅल्क्युलेटर हे ऑनलाईन टूल वापरू शकता. भारतातील लोकप्रिय जमीन मापनाची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे:

  • ​हेक्टर

हेक्टर अधिकांशतः कृषी किंवा वन जमीन मोजण्यासाठी वापरले जाते. टाउन प्लॅनिंग आणि इस्टेट मूल्यांकनासाठी जमीन सर्वेक्षण करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो.

  • एकर

एकर हे युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याठिकाणी लोकप्रिय जमीन मापन आहे. भारतात शेतजमीन किंवा संपत्तीचे बहुतेक प्लॉट्स एकरमध्ये मोजले जातात.

  • बिघा

बिघा हे पंजाब, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात आणि राजस्थानच्या भागांमध्ये जमीन मोजण्याचे पारंपारिक एकक आहे. तथापि, मोजमापाच्या या एककास कोणतीही प्रमाणित साईझ नाही. त्याचे मोजमाप राज्यानुसार बदलते. उदाहरणार्थ, पश्चिम बंगालमध्ये एक बिघा म्हणजे 1,600 चौ. या. तर उत्तराखंडमध्ये एक बिघा म्हणजे 756.222 चौ. या.

  • चौरस फूट

चौरस फूट हे जगभरात सामान्यपणे वापरले जाणारे जमीन मोजमाप एकक आहे. हे प्रमाणित मापन एकक इम्पेरिअल आणि यूएस कस्टमरी युनिट्सचा भाग आहे. चौरस फूट म्हणजे प्रत्येक बाजूला फक्त एक फूट उंच असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ म्हणून परिभाषित केले जाऊ शकते.

  • ग्राऊंड

ग्राऊंड हे दक्षिणेकडील तमिळनाडू राज्यात सामान्यपणे वापरले जाणारे जमीन मोजमाप एकक आहे. एक ग्राऊंड म्हणजे 24,000 चौ. फू. किंवा 203 चौ.मी.

  • चौरस मीटर

चौरस मीटर ज्यास मीटर स्क्वेअर्ड म्हणूनही ओळखले जाते, हे स्टँडर्ड इंटरनॅशनल (एसआय) आधारित जमीन क्षेत्रफळ मोजमापाचे एकक आहे, जे असे दर्शविले जाते स्क्वे. मी. किंवा मी².

  • कठ्ठा

कठ्ठा हे भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये वापरले जाणारे लोकप्रिय जमीन मोजमाप एकक आहे. बिघा प्रमाणेच, या एककास देखील कोणतीही प्रमाणित साईझ नाही कारण ते विविध राज्यांमध्ये बदलते. उदाहरणार्थ, बिहारमध्ये एक कठ्ठा म्हणजे 1,361.25 चौ.फू. आणि पश्चिम बंगालमध्ये 720 चौ.फू.

या एककांव्यतिरिक्त, संपूर्ण भारतातील विविध प्रदेशांमध्ये इतर जमीन मोजमाप एकक देखील वापरले जातात:

  • कनल
  • घुमाऊं
  • बिस्वांसी
  • किल्ला
  • अंकनम
  • सेंट
  • गुंठा
  • कुंचम
  • धुर
  • लेचा
  • चातक
  • दशांश

डिस्क्लेमर_WC अरेकनव्हर्जन कॅल

अस्वीकृती

हे कॅल्क्युलेटर केवळ सामान्य माहितीच्या हेतूसाठी प्रदान केले जाते आणि त्याला आर्थिक सल्ला म्हणून विचारात घेतले जाऊ नये. कॅल्क्युलेटरमधून मिळालेले परिणाम हे तुमच्या इनपुटवर आधारित आहेत. यूजरला वेबसाईटवर असलेल्या माहितीच्या आधारावर कार्यवाही करण्यापूर्वी स्वतंत्र कायदेशीर आणि व्यावसायिक सल्ला घेण्याचा सल्ला दिला जातो. वर नमूद केलेल्या माहितीवर विश्वास ठेवणे हे नेहमीच यूजरची एकमेव जबाबदारी आणि निर्णय असेल आणि यूजरने या माहितीच्या कोणत्याही वापराची संपूर्ण जोखीम गृहीत धरावी.

कोणत्याही परिस्थितीत बजाज हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ('बीएचएफएल') किंवा बजाज ग्रुप, त्यांचे कर्मचारी, डायरेक्टर्स किंवा त्यांचे कोणतेही एजंट किंवा कोणतेही इतर पार्टी हे वेबसाईट तयार करण्यात, उत्पादन करण्यात किंवा डिलिव्हर करण्यात सहभागी असलेल्या कोणत्याही प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, दंडात्मक, प्रासंगिक, विशेष, परिणामी नुकसानीसाठी (गमावलेले महसूल किंवा नफा, बिझनेसचे नुकसान किंवा डाटाची हानी) किंवा वर नमूद केलेल्या माहितीवर युजरच्या अवलंबून असलेल्या कोणत्याही नुकसानीसाठी जबाबदार असणार नाही.

Area Conversion Calculator_FAQs_WC

क्षेत्रफळ रूपांतरण कॅल्क्युलेटर: एफएक्यू

भारतात जमिनीच्या क्षेत्रफळाचे मोजमाप विविध राज्यांमध्ये वापरलेल्या जमीन मोजमाप एककांवर अवलंबून असते. सामान्यपणे, निवासी प्लॉट्स चौरस फूटामध्ये मोजले जातात, तर शेतजमीन एकरमध्ये मोजली जाते. मॅन्युअल रूपांतरणाचा गोंधळ टाळण्यासाठी, तुम्ही मोजमापाचे एक एकक दुसऱ्या एककामध्ये रूपांतरित करण्यासाठी जमीन क्षेत्रफळ रूपांतरण कॅल्क्युलेटर वापरू शकता.

अनियमित जमीन हे एक अनियंत्रित जमीन स्वरूप आहे जे एकसमान नाही. अशा जमीन भागांसाठी जमीन मोजमाप कॅल्क्युलेट करण्यास मदत करण्यासाठी विशेष फॉर्म्युला आहेत. क्षेत्रफळाचे त्रिकोण, आयत, चौरस, वर्तुळ किंवा समांतरभुज चौकोन यांसारख्या परिचित आकारांमध्ये विभाजन करा. त्यानंतर, त्यांचा वैयक्तिक फॉर्म्युला वापरून क्षेत्रफळ मोजा. अनियमित जमिनीचे क्षेत्रफळ मिळवण्यासाठी परिणाम जोडा. वैकल्पिकरित्या, तुम्ही त्रास-मुक्त परिणाम मिळविण्यासाठी जमीन क्षेत्रफळ कॅल्क्युलेटर ऑनलाईन वापरू शकता.

Google मॅप्स वापरून जमिनीचे क्षेत्रफळ कॅल्क्युलेट करण्यासाठी, 'अंतर मोजा' पर्याय निवडा. त्यानंतर, तुम्हाला जे क्षेत्रफळ काढायचे आहे त्या जमिनीच्या प्लॉटमध्ये झूम इन करा. मॅपच्या क्षेत्राच्या कडेला रेषा काढा. एकदा पूर्ण झाल्यानंतर, Google ऑटोमॅटिकरित्या तुमच्या स्क्रीनवर निवडलेल्या क्षेत्राच्या मोजमापाची प्रोसेस करेल आणि प्रदर्शित करेल.

तुमच्याकडे अचूक मोजमाप झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या प्राधान्यित एककांमध्ये माप रूपांतरित करण्यासाठी जमीन क्षेत्रफळ रूपांतरण कॅल्क्युलेटरचा वापर करू शकता.

निवासी प्रॉपर्टीचे क्षेत्रफळ सामान्यपणे चौरस फूटामध्ये मोजले जाते. तुम्हाला फक्त लांबी आणि रुंदी फूटामध्ये मोजणे आवश्यक आहे. एकदा हे पूर्ण झाल्यानंतर जमिनीची साईझ मोजण्यासाठी फीट मधील लांबीला रुंदीने गुणिले जाते. एक चौरस फूट चे रूपांतरण 144 चौरस इंच होय. तुम्ही कठीण मॅन्युअल कॅल्क्युलेशन टाळण्यासाठी आणि अचूक परिणाम मिळवण्यासाठी ऑनलाईन जमीन कॅल्क्युलेटर वापरू शकता.

एकरमध्ये जमिनीच्या भागाची गणना करण्यासाठी, फूटमध्ये क्षेत्राची लांबी आणि रुंदी मोजा. पुढे, क्षेत्रफळ एकरमध्ये रूपांतरित करण्यासाठी क्षेत्रफळ रूपांतरण कॅल्क्युलेटर वापरा.

आंतरराष्ट्रीय स्तरावर, जमिनीच्या प्लॉट मोजमापाचे मानक एकक हे स्क्वे.मीटर म्हणजे (m2), स्क्वे फूट (ft2), स्क्वे यार्ड (yd2) >), एकर आणि हेक्टर आहेत. SI (इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स) अंतर्गत, जमिनीच्या क्षेत्रफळाचे मानक स्क्वे मीटर आहे. जमिनीच्या मोजमापाच्या सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या मेट्रिक युनिट्समध्ये स्क्वे.मी, स्क्वे. किलोमीटर आणि स्क्वे. सेंटीमीटर यांचा समावेश होतो. नॉन-मेट्रिक युनिट्ससाठी, लोकप्रिय एकके म्हणजे स्क्वे. इंच, स्क्वे. फूट, स्क्वे. यार्ड आणि स्क्वे मैल आहेत.

बिघाचे मूल्य राज्यनिहाय बदलते. उत्तर प्रदेशमध्ये 1 एकर म्हणजे 1.613 बिघा तर उत्तराखंडमध्ये 1 एकर म्हणजे 5 बिघा आहे. पश्चिम बंगालमध्ये 1 एकर म्हणजे 3.025 बिघा आहे. तर गुजरातमध्ये ते 2.5 बिघा आहे. हरियाणा आणि पंजाबमध्ये लोक 1 एकर म्हणजे 4 बिघा मानतात परंतु बिहारमध्ये, 1 एकर म्हणजे 1.6 बिघा आहे.

आर हे जमीन मोजमापाचे मेट्रिक सिस्टीम मधील एकक होय. एक आर म्हणजे 100 स्क्वे.मीटर्स होय. जेव्हा ते पहिल्यांदा सादर करण्यात आले. तेव्हा ते मेट्रिक सिस्टीम मधील प्रमाणित युनिट होते. परंतु कालांतराने त्याच्याऐवजी स्क्वे.मीटर्सचा वापर सुरु करण्यात आला.. एकर हे एरियाचे आंतरराष्ट्रीय युनिट आहे. मोठ्या जमिनीवरील प्लॉटच्या मापनासाठी वापरले जाते.. ब्रिटिश राजवटीच्या काळातील वापरात असलेल्या जुना मोजमाप पद्धतीमधील हे एकक होते. एक एकर म्हणजे 40.47 होय.

Area Conversion Calculator_RelatedArticles_WC

Area Conversion Calculator_PAC_WC

जाणून घेण्यासारखे

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

अधिक जाणून घ्या

Call_And_Missed_Call